सलमान खानने अनेक स्टार किड्सना लाँच केले आहे, त्यापैकी एक म्हणजे सूरज पंचोली. सूरजने सलमानने स्वतः निर्मित केलेल्या ‘हीरो’ चित्रपटातून पदार्पण केले. जेव्हा सूरजने चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा जिया खान आत्महत्या प्रकरणाबाबत त्याच्यावर अनेक आरोप झाले. सलमान नेहमीच त्याच्या पाठीशी उभा राहिला. आता सूरजने सलमानबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

त्याचे घर सर्वांसाठी खुले आहे : सूरज पंचोली

इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या मुलाखतीत सूरज म्हणाला की सलमानचे घर पूर्वी नेहमीच उघडे असायचे. त्याच्या दाराला कुलूप असायचे; पण ते कधीही वापरले जात नव्हते. जर तुम्हाला जेवण करायचे असेल,तर तुम्ही फक्त फ्रीज उघडा आणि जेवा. तुम्हाला कोणीही रोखणार नाही. तुम्हाला त्याचे प्रोटीन शेक किंवा जीवनसत्त्वे हवी असली तरी तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला कोणीही रोखणार नाही.

सूरजने हे देखील सांगितले की, सलमान कधीही पाहुण्यांना बाहेरचे वाटू देत नाही. तो म्हणाला, “बऱ्याचदा असे घडायचे की, जेव्हा तो सकाळी उठतो आणि तिथे कोणीतरी पाहतो तेव्हा तो म्हणायचा ‘ अरे, तू इथे आहेस, जेवण केलेस का?’ त्यानंतर तो कोणालाही त्रास न देता शांतपणे त्याच्या कामात व्यग्र व्हायचा.”

तो सेटवर जेवणही शेअर करतो

सूरज पुढे म्हणाला, “अनेक लोक असे म्हणतात आणि हे खरे आहे की जेव्हा जेव्हा सलमानचे लंच किंवा डिनर आयोजित केले जाते तेव्हा ते फक्त त्याच्यासाठीच नाही तर संपूर्ण युनिटसाठी असते. सर्व जेवण त्याच्या घरून येते आणि फार कमी लोकांना माहीत आहे की, त्याचे जेवण सर्वांसाठी असते. तुम्ही फक्त या, प्लेट घ्या आणि खा. कोणालाही कधीही नकार दिला जाऊ शकत नाही.”

सूरजने सांगितले की, तो त्याचा जिम सेटअप कोणाबरोबरही शेअर करतो. तो म्हणाला, “तो सेटवर कुठेही त्याचा जिम सेट करतो आणि कोणीही येऊन त्याच्या जिमची उपकरणे शेअर करू शकतो. इथेही तो कोणालाही नकार देत नाही.’

अभिनेता सूरज पंचोली नुकताच ‘केसरी वीर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहे. मात्र, २३ मे २०२५ ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.