प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि चित्रपट निर्माता सुदीप पांडे (Actor Sudip Pandey Death) याचे निधन झाले. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत सुदीपची प्राणज्योत मालवली. सुदीपच्या निधनाने त्याचे चाहते व सहकलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त करत आहेत.

सुदीप पांडे हा भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता होता. अवघ्या तिशीत असलेल्या सुदीप पांडेचे हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्याने अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याने फक्त भोजपुरीच नाही तर हिंदी चित्रपटही केले होते. सुदीप हा सॉफ्टवेअर इंजिनिअरदेखील होता. अभिनयाची आवड असल्याने तो इंजिनिअरींग सोडून या क्षेत्रात आला होता.

हेही वाचा – Saif Ali Khan: दरोडेखोराने १ कोटी रुपये मागितले, सैफ अली खानच्या घरातील मदतनीसची पोलीस जबाबात माहिती

सुदीप सध्या त्याच्या आगामी ‘पारो पटना वाली’ या चित्रपटात काम करत होता. खूनी दंगल, भोजपुरी भैया आणि बहिनिया यांसारख्या सिनेमांद्वारे त्याने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. २०१९ मध्ये त्याने वी फॉर व्हिक्टर या हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. सुदीपने भोजपुरिया दरोगा, मसिहा बाबू, हमर संगी बजरंगबली आणि हमर ललकार यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटा व्यतिरिक्त, सुदीपने बिहार टुरीझमसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम केलं होतं.

हेही वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदीप पांडेच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, त्याला खूप अडचणी होत्या. त्याने ‘व्हिक्टर’ नावाचा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला, त्यामुळे सुदीपने आपले सर्व पैसे गमावले आणि तो कर्जबाजारी झाला होता. सुदीपच्या निधनाची माहिती समजल्यावर त्याचे सहकारी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. ते सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनेता सुदीप पांडेला श्रद्धांजली वाहत आहेत.