Sundeep Kishan Vivaha Bhojanambu Restaurant Raid: संदीप किशन हा लोकप्रिय तेलुगू अभिनेता आहे. तो सध्या त्याच्या रेस्टॉरंटमुळे चर्चेत आहे. तेलंगणाच्या अन्न सुरक्षा विभागाने ८ जुलै रोजी संदीप किशनच्या ‘विवाह भोजनांबु’ या रेस्टॉरंटवर छापा टाकला. यावेळी रेस्टॉरंटमध्ये सहा नियमांचे उल्लंघन झाल्याचे त्यांना आढळले. आता संदीपने याबद्दल प्रतिक्रिया देत रेस्टॉरंटचा बचाव केला आहे.

हैदराबादमध्ये ‘रायन’ या तामिळ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी संदीप किशन पोहोचला होता. त्याला रेस्टॉरंटमधील नियमांच्या उल्लंघनाबाबत विचारण्यात आलं. त्यावर अभिनेता म्हणाला की ‘विवाह भोजनांबू’ आपण पैसे कमवण्यासाठी नव्हे जवळच्या चिरंजीवी रक्तपेढीला भेट देणाऱ्या गरजू लोकांना मोफत जेवण देण्यासाठी सुरू केले आहे.

संदीप किशनची प्रतिक्रिया

संदीप किशन म्हणाला, “विवाह भोजनांबुच्या सात आउटलेटमधून प्रत्येकी आम्ही दररोज जवळपास ५० फूड पॅकेट्स दान करतो. हे आउटलेट्स दररोज २५० मोफत फूड पॅकेट बनवते. ते एक पाकिट बनवण्यासाठी आम्हाला ५० रुपयांचा खर्च येतो. हा खर्च महिन्याला चार लाखांवर जातो. आम्ही दर महिन्याला चार लाख रुपयांचे मोफत अन्न दान करतोय, त्यामुळे फक्त काही रुपयांसाठी एक्सपायरी डेट गेलेले तांदूळ आम्ही का वापरू?”

Sandeep Kishan
अभिनेता संदीप किशन (फोटो – इन्स्टाग्राम)

१६ वर्षांनी लोकप्रिय कलाकाराने सोडला ‘तारक मेहता…’ शो, निरोप घेताना झाला भावुक; म्हणाला, “माझे पात्र खूप…”

रेस्टॉरंटमध्ये काही किरकोळ समस्या आढळल्याचं संदीपने मान्य केलं, पण त्याचा स्वयंपाक व सुरक्षेशी काहीच संबंध नसल्याचं त्याने सांगितलं. “आपण कितीही दानधर्म केले तरी स्वच्छता महत्त्वाची आहे. आमच्या रेस्टॉरंटमध्ये यासंदर्भात काही आढळल्याचं अन्न सुरक्षा विभागाने म्हटलेलं नाही. रेस्टॉरंटमध्ये पाणी साचले नव्हते, तर तिथे एक नाला आहे,” असंही त्याने नमूद केलं.

“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव

रेस्टॉरंटमध्ये छापेमारी झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक आले होते असा दावा त्याने केला. “जे आमच्या रेस्टॉरंटमधील पदार्थ खातात ते आमच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवतात, त्यामुळे छापेमारीचा काहीच परिणाम झाला नाही. छापेमारीच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक आले होते,” असं तो म्हणाला.

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

अन्न सुरक्षा विभागाने काय म्हटलंय?

संदीप किशनच्या रेस्टॉरंटमध्ये कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले, याबाबत तेलंगणाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी छापेमारीनंतर एक्सवर पोस्ट केली होती. “२५ किलो चिट्टीमुत्यालू तांदळाची एक्सपायरी डेट २०२२ ची होती, ते याठिकाणी आढळले. तसेच अर्धा किलो ​​ग्रॅम खवलेल्या नारळात सिंथेटिक फूड कलर आढळले होते. याशिवाय स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवलेले न शिजवलेले खाद्यपदार्थ आणि काही अर्धवट तयार केलेल पदार्थ झाकलेले होते पण त्यावर नीट लेबल लावलेले नव्हते,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काही डस्टबिन झाकलेले नव्हते. खाद्यपदार्थ जे लोक हाताळत होते, त्यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट नव्हते. स्वयंपाकघराच्या परिसरातील नाल्यांमध्ये पाणी साचले होते. जेवण तयार करण्यासाठी व ग्राहकांना पिण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याचे रिपोर्ट्सही तिथे नव्हते,” असंही या पोस्टमध्ये म्हटलं होतं.