scorecardresearch

VIDEO : धारावीच्या गल्लीत फिरणाऱ्या सुनील शेट्टीचं नेटकऱ्यांना कौतुक, म्हणाले, “याला बॉडीगार्डची गरजच नाही कारण…”

अभिनेता सुनील शेट्टीचा धारावीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

suniel shetty walking in slum area, suniel shetty video viral, suniel shetty spotted in dharavi,
अभिनेता सुनील शेट्टीचा धारावीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता सुनील शेट्टीने कलाक्षेत्राला दिलेलं योगदान फार मोठं आहे. सुनील शेट्टीने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. वयाच्या साठीमध्ये पदार्पण केलं तरी तो काम करतच आहे. शिवाय या वयात त्याचा फिटनेस तर कमालीचा आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील त्याचा लूक पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. तसेच त्याच्या शरीरयष्टीचं नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…”

सुनीलचा हा व्हायरल व्हिडीओ आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमधील आहे. या व्हिडीओमध्ये तो धारावीच्या गल्लीमध्ये फिरताना दिसत आहे. काळ्या रंगाचं टि-शर्ट आणि त्याच रंगाची पँट, शूज त्याने परिधान केले आहेत. धारावीमध्ये सुनील का गेला? असा प्रश्न देखील अनेक जण विचारत आहेत. खरं तर तो त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या चित्रीकरणासाठी धारावीमध्ये पोहोचला होता.

सुनीलचा हा व्हिडीओ पाहून एका युजरने म्हटलं की, “तो कधीच म्हातारा होऊ शकत नाही.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, “हा ६० वर्षाचा आहे याच्यावर कोणाचा विश्वास बसेल…” तर काहींना त्याच्या ‘धडकन’ चित्रपटाची आठवण झाली. हा तर अंजलीला शोधत असल्याचं देखील काही लोकांनी कमेंटमध्ये गंमतीने म्हटलं आहे.

आणखी वाचा – बॉलिवूडला अच्छे दिन येणार, रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझर पाहून नेटकरी भारावले

सुनील शेट्टीचं नाव कलाविश्वात आदरानं घेतलं जातं. आजही तो तितक्याच जिद्दीने आणि मेहनतीने काम करतो. सुनील तेलुगू चित्रपट ‘घानी’मध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबरीने नेपाळी चित्रपट ‘एक्स ९’मध्येही तो काम करताना दिसेल. सुनील शेट्टीची काम करण्याची जिद्द पाहता वय हा फक्त त्याच्यासाठी आकडा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor suniel shetty at dharavi slum area video goes viral on social media fans says age is just a number see details kmd

ताज्या बातम्या