बॉलिवूडमधील काही कलाकार मंडळींचे चेहरे ड्रग्जच्या प्रकरणामध्ये समोर आले. अलिकडेच श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शाहरुख खानचा लेक आर्यनचं ड्रग्ज प्रकरण तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. बॉलिवूडच्या मंडळींची ड्रग्ज प्रकरणामध्ये नावं समोर येत असताना अभिनेता सुनील शेट्टीने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा – “आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा”; एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

सुनील शेट्टीने एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. सुनील या व्हिडीओमध्ये बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत बोलताना दिसत आहे. त्याने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबाबत आपलं मत व्यक्त करत चित्रपटसृष्टीला पाठिंबा दिला आहे.

सुनील शेट्टी नेमकं काय म्हणाला?
“एकाने चुकी केली की सगळे बोलतात बाकीचे देखील चोर आहेत, ड्रग्जची नशा करत आहेत. पण असं काहीच नाही. मी ३० वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. माझे असे ३०० मित्र आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये आतापर्यंत कोणतंच व्यसन केलेलं नाही. पण बॉलिवूड हे ड्रग्जच्या आहारी गेलेल्या लोकांनी भरलेलं नाही. कोणाची अशी चूक झाली असेल तर त्याला लहान समजून माफ करा. #boycottbollywood, #bollywooddruggies असं काहीच नाही आहे.” असं सुनील शेट्टीने म्हटलं आहे.

आणखी वाचा – Photos : शरद पोंक्षे यांचा मुलगा कोण आहे माहितेय का? ‘धर्मवीर’ चित्रपटासाठीही केलंय काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील शेट्टीच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर त्याला विरोध दर्शवला आहे. तसेच काहींनी सगळेच तसे नसतात असं म्हणत सुनील शेट्टीला पाठिंबा दिला आहे. ड्रग्ज प्रकरणाबाबत बॉलिवूडमधील काही मंडळींची नावं समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत कलाकारांवर टीका देखील केली होती.