फिल्म इंडस्ट्रीत कलाकारांनी एका चित्रपटासाठी ५० किंवा १०० कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण फक्त तीन शब्द बोलण्यासाठी एका अभिनेत्याने अब्जो रुपये मानधन आकारलं होतं.

चित्रपट व्यवसाय इतका मोठा आहे की अनेक फिल्मस्टार कोट्याधीश आणि अब्जाधीशही झाले आहेत. मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करण्यासाठी अभिनेते कोट्यवधी रुपये मानधन घेतात. पण एक अभिनेता आहे ज्याने पडद्यावर दिसत नसूनही फक्त तीन शब्द उच्चारण्यासाठी खूप जास्त मानधन घेतलं होतं. ही गोष्ट हॉलीवूड स्टारची आहे.

तीन शब्द उच्चारण्यासाठी १५ मिलियन अमेरिकन डॉलर्स आकारणारा अभिनेता म्हणजे विन डिझेल होय. विन डिझेल हा फास्ट अँड द फ्युरियसमधील मुख्य भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. या फ्रँचायझीमधील एका चित्रपटासाठी त्याने सुमारे ४७ मिलियन डॉलर्स घेतले होते. तर या सीरिजमधून त्याने आतापर्यंत जवळपास २०० मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. पण, मागील काही वर्षांत विनची आणखी एक भूमिका खूप चर्चेचा विषय ठरली, ती म्हणजे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील ग्रूटची. विन डिझेलने पहिल्यांदा २०१४ मध्ये गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 1 मध्ये या पात्राला आवाज दिला होता, मग दोन सिक्वेलमध्ये तसेच दोन अ‍ॅव्हेंजर्स चित्रपटांमध्ये – इन्फिनिटी वॉर आणि एंडगेममध्ये पुन्हा आवाज दिला होता.

३ शब्द उच्चारण्यासाठी निर्मात्यांनी दिले तब्बल…

गेल्या काही वर्षांत विन डिझेलने ग्रूटच्या भूमिकेसाठी प्रति चित्रपट १३.५ मिलियन डॉलर्स कमावले, असं म्हटलं जायचं. पण काही वृत्तांनुसार, त्याने या भूमिकेतून १२ ते १५ मिलियन डॉलर्स (१,३२१,७५४,८८० रुपये) इतकी कमाई केली आहे. फक्त आवाजासाठी इतकं मानधन आकारणं ही मोठी गोष्ट आहे. रंजक गोष्ट अशी की पूर्ण एमसीयूमध्ये, ग्रूट फक्त तीन शब्द ‘I am Groot’ असं बोलतो. हे तीन शब्द वेगवेगळ्या स्वरात आणि वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो इतकंच काय त्यातलं वेगळेपण. दुसऱ्या चित्रपटात त्याच्या पात्राने फक्त एकदाच ‘We are Groot’ असं म्हटलं होतं. मार्वल स्टुडिओजने विन डिझेलची लोकप्रियता पाहता इतके जास्त मानधन दिले होते.

२०१४ ते २०२३ या नऊ वर्षांच्या कालावधीत विन डिझेलने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने चार फास्ट अँड फ्युरियस चित्रपट आणि XXX: रिटर्न ऑफ Xander केजमध्ये देखील काम केलं आहे. या चित्रपटांच्या यशामुळे विन डिझेलचा जगातील टॉप फिल्म स्टारपैकी एक म्हणून ओळखला जातो. लवकरच विन डिझेल त्याच्या आणखी एका जुन्या भूमिकेतून परतणार आहे. रिडिक: फ्युरियामध्ये, तो रिचर्ड बी रिडिकची भूमिका करणार आहे. त्याने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या पिच ब्लॅकमध्ये पहिल्यांदा ही भूमिका केली होती, नंतर तो दोन्ही सिक्वेलमध्येही झळकला होता.