‘आदुजीवितम’ फेम सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल आई झाली आहे. अमालाच्या पतीने एक सुंदर व्हिडीओ शेअर करत ते आई- बाबा झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. अमालाने गोंडस बाळाला जन्म दिला असून त्याचं नाव या जोडप्याने काय ठेवलं, तेही सांगितलं आहे. अमाला लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांनी आई झाली आहे.

अमाला पॉलने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी लग्न केलं होतं. त्यांचं लग्न केरळमधील कोची इथं झालं होतं. अमालाचं हे दुसरं लग्न आहे, आता ती आई झाली असून जगतने घरात बाळाचं व तिचं स्वागत केलं तेव्हाचा व्हिडीओ शेअर केला आहे. अमालाने एका मुलाला जन्म दिला आहे. ११ जून २०२४ रोजी त्याचा जन्म झाला. अमाला व जगत यांनी त्यांच्या मुलाचं नाव ‘इलाई’ ठेवलं आहे.

जगतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये खोलीतील सुंदर सजावट पाहायला मिळत आहे. जगत अमाला व बाळाला घेऊन येतो आणि त्यांचं छानसं स्वागत केलं जातं. खोलीत छान फुग्यांची सजावट करण्यता आली आहे. तिथे अमाला नंतर बाळाचा पकडून पोज देताना दिसते. या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटी कमेंट्स करून या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत.

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाशी प्रेमविवाह, धनुषमुळे लग्न मोडल्याचा सासरच्या मंडळींचा आरोप अन्…, अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अमालाने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिचा पती जगत देसाई हा गुजराती असल्याने पारंपरिक गुजराती पद्धतीने सुरतमध्ये तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो खूप चर्चेत होते.

नोव्हेंबर महिन्यात झालं अमाला व जगतचं लग्न

अमाला पॉलने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. तिने केरळमधील कोची येथे तिचा बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी लग्न केलं. त्यांचं लग्न ग्रँड हयात कोची बोलगट्टी इथे पार पडलं होतं. जगत मूळचा सुरतचा असून तो गोव्यातील एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.

तीन वर्षांत घटस्फोट, दुसऱ्या लग्नानंतर दोन महिन्यात दिली गुडन्यूज, गुजराती पद्धतीने पार पडलं अभिनेत्रीचं डोहाळे जेवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिलं लग्न व घटस्फोटामुळे चर्चेत राहिलेली अमाला

अमालाचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. २०१४ मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि काही गैरसमजांमुळे २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. धनुषमुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याचा आरोप तिच्या सासऱ्यांनी केला होता, पण अमालाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.