सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचा विवाहसोहळा २०१६मध्ये थाटामाटात पार पडला. त्यांनी व्यावसायिक आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरशी लग्न केलं. अभिनयक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. पण उर्मिला यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये पती मोहसिन यांनी त्यांची साथ दिली. याचबाबत उर्मिला यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

आणखी वाचा – Photos : सई ताम्हणकरचा कथित बॉयफ्रेंड आहे तरी कोण?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पिंक विलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्मिला यांनी आपलं पतीसोबत असणारं नातं तसेच त्यांचा आपल्याला असणार पाठिंबा याबाबत सांगितलं. “राजकीय क्षेत्रात काम करताना पती मोहसिन यांनी मला पाठिंबा दिला. ते मला पाठिंबा देत आहेत हे पाहून मलाही धक्काच बसला होता. प्रत्येकवेळी माझं मत सगळ्यांसमोर मांडण्याचं बळ, विश्वास त्यांच्याकडूनच मला मिळाला. याआधी कदाचित मी इतक्या आत्मविश्वासाने कधीच बोलली नसावी. म्हणूनच मी कायम म्हणते मुलगी, पत्नी आणि सून म्हणून मी स्वतःला नशिबवान समजेत.” असं उर्मिला यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “लग्न ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळते. आपल्या पालकांची निवड आपण स्वतः करत नाही. जन्मतःच आपल्याला आई-वडिलांची माया मिळते. पण जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपल्याप्रती आणि इतरांप्रती प्रत्येक गोष्टीची जबाबदारी वाढते. म्हणूनच लग्नासाठी मी तयार आहे की नाही याची खात्री मला जोपर्यंत पटली नाही तोपर्यंत मी लग्नच केलं नव्हतं.”

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचं सुखी कुटुंब, पत्नी-मुलासोबतचे सुंदर फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्न हे योग्य वेळी योग्य व्यक्तीबरोबरच झालं पाहिजे असंही उर्मिला यांचं मत आहे. उर्मिला आणि मोहसिन यांच्यामध्ये ९ वर्षांचे अंतर आहे. उर्मिला पतीसोबतचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. मोहसिन यांनी मॉडलिंग क्षेत्रातही काम केलं आहे. तसेच उर्मिला सध्या रुपेरी पडद्यापासून लांब आहेत.