आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं जाहिर केलं.

आणखी वाचा – कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

बिपाशा आपलं गरोदरपण एण्जॉय करताना दिसत आहे. गरोदरपणा तिने खास फोटोशूट केलं. यादरम्यानचेच काही फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी तिने चाहत्यांपर्यंत पोहोचवली. आता तिने एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये बिपाशाने काळ्या रंगाचा बॉडी फिट गाऊन परिधान केलेला दिसत आहे. तसेच यावर नेकपिस घालणं तिने पसंत केलं आहे. बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो यामध्ये दिसून येत आहे. शिवाय तिचा लूकही बदलला असल्याचं स्पष्टपणे दिसतय. काही तासांमध्येच बिपाशाच्या या क्युट व्हिडीओला हजारो लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Photos : वयाच्या ४३व्या वर्षी आई होणार बिपाशा बासू, शेअर केले गरोदरपणातील काही खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१६मध्ये बिपाशा आणि करणचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. लग्नाच्या ६ वर्षानंतर दोघांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या ४३व्या वर्षी बिपाशा आई होणार आहे. ती सोशल मीडियाद्वारे याबाबत आनंद व्यक्त करताना दिसत आहे.