“शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी…” हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्री हेमांगी कवीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Hemangi Kavi, Actress Hemangi Kavi, Hemangi Kavi instagram, Tamasha Live, Tamasha Live movie
अभिनेत्री हेमांगी कवीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये हेमांगी कवीचं नाव आवर्जून घेतलं जातं. हेमांगी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. एखाद्या विषयावर आपलं मत ती स्पष्टपणे मांडताना दिसते. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत देखील तिने एक पोस्ट शेअर केली होती. आता या पोस्टनंतर हेमांगीने आणखी एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे.

आणखी वाचा – प्रसिद्ध रॅपर रफ्तार घेणार घटस्फोट, लग्नाच्या अवघ्या ६ वर्षांमध्येच मोडला संसार

हेमांगी सध्या तिच्या आगामी ‘तमाशा Live’ या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे बरेच फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत असते. हेमांगीने यादरम्यान स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच तिने शेअर केलेली पोस्ट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. हेमांगीची ही पोस्ट पाहून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

“शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी शिकार होते. नेहमीच पंजांनी नाही तर कधी कधी डोळ्यांनी होते. तेव्हा जपून…” असं हेमांगीने तिचा फोटो शेअर करत म्हटलं आहे. टायगर प्रिंट स्कर्ट, काळ्या रंगाचा टॉप हेमांगीने परिधान केला असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. तिचा हा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. “कसली जीवघेणी नजर तुझी, एकदम मस्त” असं एका युजरने म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “राजकीय घडामोडी सुरु असताना…”

याआधी हेमांगीने आपल्या पोस्टद्वारे राज्यातील राजकारणाबाबत भाष्य केलं होतं. ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असं हेमांगीने म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर तिने लगेचच तिच्या आगामी चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ ‘तमाशा Live’ या चित्रपटातील आहे. “हाच खरा हाय वाघ” असे या गाण्याचे बोल आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress hemangi kavi instagram post goes viral on social media during promotion of marathi movie tamasha live kmd

Next Story
मलायका- अर्जुन निघाले रोमँटीक व्हेकेशनवर, युजर्स म्हणाले “आता लग्नाची…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी