शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकासआघाडी सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. पण अद्याप त्यांना यश येत नसल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व बंडखोर शिवसेना आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात भलताच पेच निर्माण झाला आहे. यावर विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवी हिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. हेमांगी ही नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर तिचे मत व्यक्त करत असते. नुकतंच राज्यातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असे हेमांगीने म्हटले आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

“सत्ता बळकावणार्‍याला नाही तर…”, अभिनेते किरण माने यांची मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया

तिच्या या पोस्टवरुन अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. “माणसाला जनावर म्हणलं तर राग येतो आणि वाघ म्हणलं की भारी वाटतं.पण त्यांना कोण सांगणार वाघ सुद्धा जनावरच आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने दिली आहे. तर एका नेटकऱ्याने या महाराष्ट्रात वाघ फक्त दोनच होऊन गेले, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज, असे म्हटले आहे. तर एकाने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच अशी कमेंट केली आहे.

पत्नी तृप्तीपासून घटस्फोट घेण्यावर सिद्धार्थ जाधवचं स्पष्टीकरण, म्हणाला “आम्ही…”

दरम्यान हेमांगी कवीने या पोस्टनंतर तिच्या आगामी चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘तमाशा Live’ या चित्रपटातील आहे. येत्या १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हाच खरा हाय वाघ ! असे या गाण्याचे बोल आहे.