बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर खान काही ना काही कारणाने चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये तिला ‘गॉसिप क्वीन’ म्हणून ओळखलं जातं. करीना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. करीनाने लग्न व करिअर यांच्यात समतोल साधला आहे. कुटुंबाला ती कायमच प्राधान्य देत असते. आता बेबो पुन्हा चर्चेत आहे ती तिच्या फिटनेसच्या व्हिडीओमुळे, ज्यात तिचा धाकटा लेक दिसत आहे.

करिनाने करियर, लग्न, प्रेग्नन्सी या सर्व टप्यांमध्ये फिटनेसला कायमच महत्व दिले आहे. नुकताच तिने एक वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात धाकटा लेक जेहदेखील दिसत आहे. या व्हिडीओवर तिने कॅप्शन दिला आहे, “माझ्या सर्वोत्तम वर्कआउट मित्रासोबत वर्कआउट करत आहे. अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“आणि तो अंधारातून पुन्हा प्रकाशात…” ‘पठाण’च्या नेत्रदीपक यशावर शाहरुख खानने मानले चाहत्यांचे आभार, पोस्ट चर्चेत

करीना मागच्या वर्षी आलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात आमिर खानदेखील होता. हा चित्रपट फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता. बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडचा चांगलाच फटका या चित्रपटाला बसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीना लवकरच ओटीटी या माध्यमावर झळकणार आहे. सुजॉय घोषच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित थ्रिलर चित्रपटातून तिचे ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. तसेच ती आता हंसल मेहता यांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.