Kiara Advani Instagram Post : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने गेल्या महिन्यात एका मुलीला जन्म दिला. कियारा आणि तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा सध्या पालकत्वाच्या सुरुवातीच्या प्रवासाचा आनंद घेत आहेत. कियारा अडवाणी सोशल मीडियावर हे क्षण शेअर करायला विसरत नाही. अलीकडेच तिने रात्री उशिरा तिच्या मुलीबद्दल एक गोंडस पोस्ट शेअर केली आहे.

कियारा अडवाणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, “मी तुझे डायपर बदलते, तू माझे जग बदलले आहे.” या पोस्टद्वारे कियारा अडवाणी तिचा पालकत्वाचा प्रवास शेअर करत आहे. ही पोस्ट शेअर होताच ती व्हायरल झाली. तिने याआधीही अशाच पोस्ट केल्या आहेत.

१५ जुलै २०२५ रोजी कियारा आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच पालक बनले. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कियाराने मुलीला जन्म दिला. दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याची घोषणा केली.

२०२३ मध्ये दोघांचे लग्न झाले

सिद्धार्थ आणि कियारा यांची पहिली भेट २०१८ मध्ये एका चित्रपटाच्या पार्टीत झाली. त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी हळूहळू सुरू झाली. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटातही दोघे एकत्र दिसले आहेत. काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले. हे लग्न जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये झाले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ आजही चर्चेत आहे. त्यांच्या लग्नात अनेक नवीन वेडिंग ट्रेंड्स पाहायला मिळाले.

कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे बॉलीवूडमधलं एक स्टार कपल आहे. २०२० पासून त्यांच्या नात्याबद्दल इंडस्ट्रीत चर्चा होती, ते एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी यावर बोलणं टाळलं होतं. दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याबाबत खुलेपणानं सांगितलं नव्हतं.

कियारा लवकरच हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या आगामी ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा हा चित्रपट आर्यन मुखर्जी दिग्दर्शित करत आहे.

हृतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर आणि कियारा अडवाणीच्या ‘वॉर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स, हृतिक- ज्यु. एनटीआर यांची फाईट, हृतिक आणि कियाराची रोमँटिक केमिस्ट्री यामुळे सिनेमाची उत्सुकता आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्येच कियाराच्या बिकिनी सीननेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.