अभिनेत्री मानसी नाईक हे तिच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर चांगलीच चर्चेत आली आहे. लवकरच ती तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. दरम्यान प्रदीप आणि तिच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध रंगलेलं दिसतंय. अशातच आता मानसी नाईकने एक पोस्ट करत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधलं आहे.
हे दोघे फोटो आणि पोस्टमधून ते एकमेकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधत आहेत. अशातच मानसी नाईकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने भोली सी सुरत या गाण्यावर नृत्य केलं आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिला आहे की “कोणीतरी मला सांगितले की तू बदलेली आहेस त्यावर मी म्हणाले हो माझं सॉफ्टवेअर अपडेट झालं आहे.”
मानसीने हा व्हिडीओ शेअर करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे “तू ऐश्वर्या रायसारखी दिसत आहेस” तर दुसऱ्याने लिहले आहे “तुझा हसरा चेहरा खूप सुंदर दिसतो.” एकाने लिहले आहे “खरंच तुझ्यात जादू आहे.” लई भारी, मस्त अशा कमेंट यावर आल्या आहेत.
‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ती एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात