बॉलिवूड सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री मिनिषा लांबाने आपल्या दिलखेचक अदा आणि दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांचे मन जिंकलंय. गेल्या काही दिवसांपासून मनिषा लांबा तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमूळे चर्चेत आलीय. मनिषाने आपल्या पहिल्या पतीसोबतचं लग्न तुटल्यानंतर एकाच्या प्रेमात पडल्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता एक बॉलिवूड अभिनेत्याकडून धोका मिळाला असल्याचा खुलासा मनिषाने केलाय.
रणबीर कपूरसोबत ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री मनिषा लांबाचं करिअर अर्थातच खूप लहान ठरलं. बॉलिवूडमध्ये तिला भरपूर संघर्ष करावा लागला. गेल्या अनेक दिवसांपासून मनिषाच्या प्रेम प्रकरणाची सुद्धा बरीच चर्चा रंगलीय. तीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मनिषा लांबा पुन्हा एकदा प्रेमात पडलीय. तिच्या बॉयफ्रेंडचा बॉलिवूडसोबत दूर दूरचा संबंध आहे. तो एक उद्योजक आहे. या दोघांची पहिली भेट २०१९ मध्ये एक पोकर चॅम्पियनशिप इव्हेंटमध्ये झाली होती.
View this post on Instagram
नुकत्याच एक माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मनिषा लांबाने तिच्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून ती दिल्लीत राहत असलेला उद्योजक आकाश मलिकला डेट करतेय. यावर बोलताना मनिषा म्हणाली, “होय, मला माझं प्रेम मिळालंय आणि मी खूप आनंदी आहे. मी प्रत्येक दिवशी त्यांची साथ मिळत असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतेय.” मनिषा लांबा आणि आकाश हे दोघेही सुरूवातीला चांगले मित्र-मैत्रीण होते.
अभिनेत्री मनिषा लांबाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आकाशसोबत एक फोटो शेअर केलाय. या फोटो शेअर करताना तिने रेड हार्ट इमोजी देखील वापरलीय. या फोटोमध्ये मनिषा आकाशच्या हातात हात घालून कॅन्डल लाइट डिनर एन्जॉय करताना दिसून आली. अभिनेत्री मनिषा लांबाचं फिल्मी करिअर जास्त काळ टिकू शकलं नाही.
View this post on Instagram
२००५ साली रिलीज झालेल्या ‘यहां से’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण ही फिल्म हिट ठरली नाही. पण मनिषाने या चित्रपटातील आपल्या अदाकारीने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकलं होते. त्यानंतर ती रणबीर कपूर याच्यासोबत ‘बचना ऐ हसीनो’ या चित्रपटानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली होती.