Nayanthara Divorce Rumours : नयनताराचे नाव दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. तिला या इंडस्ट्रीमध्ये एक सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. नयनतारा केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी अफवा पसरली आहे की, नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांच्यात सर्व काही ठीक नाही आणि दोघेही घटस्फोट घेणार आहेत. या चर्चांवर तिने स्वतः मौन सोडले आणि अफवा पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
घटस्फोटाच्या चर्चांवर नयनताराने काय म्हटले?
खरं तर, काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बनावट स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नयनताराने तिच्या लग्नाला मोठी चूक म्हटले आहे. यानंतर तिच्या लग्नात समस्या निर्माण झाल्याच्या बातम्या पसरू लागल्या आणि अभिनेत्री तिचा पती विघ्नेशला घटस्फोट देणार आहे, ही बातमी ऐकल्यानंतर तिचे चाहतेही खूप काळजीत पडले होते. आता नयनताराने या अफवांना उत्तर म्हणून एक पोस्ट शेअर केली आहे.
नयनताराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती पती विघ्नेशबरोबर दिसली आणि दोघेही आश्चर्यकारक प्रतिक्रिया देताना दिसले. हे शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमची प्रतिक्रिया… जेव्हा आपण स्वतःबद्दल विचित्र बातम्या पाहतो..” नयनताराने तिच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये तिच्या लग्नाबद्दल ही खोटी बातमी पसरवणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नयनतारा आणि विघ्नेश दोन मुलांचे आहेत पालक
अभिनेत्री नयनताराने २०२२ मध्ये विघ्नेश शिवनशी लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे जुळ्या मुलांचे पालक बनले. कामाबरोबरच दोघेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. दोघेही सोशल मीडियावर चाहत्यांसह त्यांचे प्रत्येक अपडेट शेअर करत राहतात. ते अनेकदा मुलांबरोबर सण आणि सुट्टीचे फोटो शेअर करतात. चाहतेही या फोटोंवर खूप प्रेम करतात.
नयनतारा तिच्या माहितीपट ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल’मुळे चर्चेत आहे. नयनतारा हे केवळ दक्षिण चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलीवूडमध्येही एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीने शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.