बॉलिवूडमध्ये अनेकजण आपलं नशीब आजमावण्यासाठी धडपड करत असतात. काहींना अभिनयाच्या क्षेत्रात यश मिळतं तर काहींच्या पदरी मात्र निराशा येते. तसचं अनेकांना नाव कमावण्यासाठी आणि काम मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री नीतू चंद्रा. २००५ सालामध्ये आलेल्या ‘गरम मसाला’ सिनेमातून नीतूने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. त्यानंतर काही दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं होतं. मात्र बॉलिवूडमध्ये तिला जम बसवता आला नाही. नीतूला एका बिझनेसमनने पत्नी होण्यासाठी पैशांची ऑफर केल्याचा खुलासा तिने नुकताच केलाय.

बॉलिवूड हंगामाला अभिनेत्री नीतू चंद्राने नुकतीच मुलाखत दिली होती. यात तिने अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी नीतूने तिल्या मिळालेल्या एका ऑफरचा खुलासा केला. एका बड्या बिझनेसमनने नीतूला बायको होण्यासाठी महिन्याला २५ लाख रुपयांची ऑफर दिली होती. या बिझनेसमनला सॅलराईड म्हणजेच मासिक पगारावर पत्नी हवी होती. नीतूने मात्र ही ऑफर नाकारली. अद्याप नीतू अविवाहितच आहे.

हे देखील वाचा: ‘Emergency’ Teaser : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना, टीझरमध्ये अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

या मुलाखतीत नीतूने सध्या ती बिकट परिस्थितीत असल्याचा खुलासा केला. ती म्हणाली, “१३ राष्ट्रीय पुरस्कार प्रात्प कलाकारांसोबत काम करूनही आज माझ्याकडे काम नाही. मला एका बिझनेसमनने महिन्याला २५ लाख रुपये ऑफर केले होते. मात्र मला त्याची पगारावर असलेली पत्नी व्हायचं नव्हत. माझ्याकडे पैसे नव्हते आणि कामंही नव्हतं. माझी चिंता वाढली होती. एवढं काम करूनही मलाला निरुपयोगी असल्यासारखं वाटतंय.”

पाहा व्हिडीओ-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरम मसाला सिनेमानंतर नीतू ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘वन टू थ्री’, ‘ओय लकी लकी ओय’ या सिनेमांमध्ये झळकली होती. कुछ लव्ह जैसा हा तिचा शेवटचा सिनेमा होता.