अलीकडेच ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. जगभरातून त्यांच्या निधनाबद्दल लोक शोक व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यामध्ये कोहिनूर सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. कोहिनूर हिरा परत मिळावा अशी मागणी करत लोक आपले विचार मांडत आहेत. इंटरनेटवर सुरू असलेल्या या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही उडी घेतली असून तिने या संपूर्ण प्रकरणावर आपले मत मांडले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर नव्या भूमिकेसाठी सज्ज, ‘या’ अभिनेत्रीबरोबर पहिल्यांदाच झळकणार

रवीना टंडनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ब्रिटिश – अमेरिकन कॉमेडियन जॉन ऑलिव्हर यांचा कोहिनूर हिऱ्यावर आधारित असलेला एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोहिनूरच्या ट्रेंडला आणखी वाव मिळाला. रवीनाने शेअर केलेल्या या व्हीडिओत जॉन म्हणतो की, “कोहिनूर हिरा त्यांना परत करावा अशी भारतीयांची मागणी आहे, कोहिनूर भारतातून आणण्यात आला होता, जो आता राणीच्या मुकुटाची शोभा वाढवत आहे.”

हेही वाचा : ‘त्या’ एका ट्विटवरून रवीना टंडनचा राग झाला अनावर, म्हणाली, “ती लोकं शैतानापेक्षा…”

ब्रिटीशांचा आणि त्यांनी विविध देशांतून लुटलेल्या मौल्यवान गोष्टींबद्दल त्यांच्या समाचार घेत जॉन ऑलिव्हर पुढे म्हणाले, “ब्रिटनने केवळ कोहिनूर हिराच नाही तर जगभरातून अनेक ऐतिहासिक गोष्टी त्यांच्या देशात आणल्या आहेत. त्यांनी सर्व वस्तू परत करायला सुरुवात केली, तर गुन्ह्याचे साक्षीदार असलेले प्रसिद्ध ब्रिटिश म्युझियम रिकामे होईल.” तर हा व्हिडिओ शेअर करत रवीनाने लिहिले, “अप्रतिम पंचलाईन! संपूर्ण ब्रिटीश म्युझियम सक्रिय गुन्हेगारीचे ठिकाण म्हणून घोषित करायला हवे.” रॉयल ट्रस्ट कलेक्शननुसार, दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक १९५३ मध्ये झाला. यावेळी हा हिरा त्यांना देण्यात आला. व्हिडीओमध्ये जॉन ऑलिव्हरच्या या शब्दांनी रवीनालाही हसू आले. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत रवीनाला पाठिंबा दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress raveena tandon expressed her feelings about kohinoor diamond rnv
First published on: 14-09-2022 at 12:44 IST