काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रस्त्यावर चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संताप व्यक्त करत मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का? असा सल्ला विचारला होता. त्यावर आता अभिनेत्री रिचा चड्ढाने निर्मला सीतारामन यांना एक सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या रिचा आणि तिच्या ट्विटची सर्वत्र चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

रिचाने निर्मला सीतारामन यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांना सल्ला दिला आहे. कृपया या लोकांना प्रवास करण्यासाठी एखाद्या साधनाची किंवा वाहनाची व्यवस्था करा. त्यामुळे पायी चालण्याच्या तुलनेत त्यांचा वेळ वाचेल. केवळ वेळच नाही तर त्यांचे प्राणही वाचतील, असं ट्विट रिचाने केलं आहे. रिचाने हे ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का? असा संतप्त सवाल केला आहे. रस्त्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या सुटकेस, बाळाला हातात उचलून घेऊन चालत गप्पा मारायला हव्या होत्या असं सांगताना हे नाटक नाही का ? अशी विचारणाही त्यांनी केली होती.