लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्याचा संसार मोडला आहे. अभिनेत्री रोशना ॲन रॉय आणि किचू टेलस यांनी लग्नाच्या पाच वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. रोशनाने स्वतः सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे. अजूनही ती व किचू जवळचे मित्र आहेत, असं रोशनाने म्हटलंय.
“पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर, आम्ही प्रेम आणि आदराने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मी हे सोशल मीडियावर सेलिब्रेशन करण्यासाठी सांगत नाहीये. मला वाटतंय की घटस्फोटाबाबत सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही दोघेही जिवंत आहोत, आम्ही दोघेही शांततेत जगण्यास पात्र आहोत, पण वेगवेगळ्या मार्गाने,” असं रोशनाने लिहिलं.
रोशनाची पोस्ट
ती पुढे म्हणाली, “हो, इतर कोणत्याही नात्यापेक्षा कुटुंब जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच मी बाजूला झाले आहे आणि तुला हवी असलेली सर्व स्पेस दिली आहे. मी मुक्त झालेय, तोही मुक्त झाला आहे. सर्वांना शांती लाभो. मला समोर येऊन हे शेअर करावं लागलं, पण माझ्यासाठी ते अजिबात सोपं नाही. काही यावर आनंदी होतील आणि मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचा आनंद असाच राहावा. आम्ही खूप जवळचे मित्र होतो आणि आम्ही अजूनही आहोत. किचू आणि मी, एकेकाळी एकत्र होतो, आता वेगळे झालो आहोत. आयुष्य पुढं सरकतं. या प्रवासात आमच्यासोबत असलेल्या प्रत्येकाचे आभार. मला हे लपवायचे नाही आणि मी विनंती करतेय की आम्ही आमच्या आयुष्यात वेगळे पुढे जात असताना प्रत्येकाने आमच्या पर्सनल स्पेसचा आदर करावा.”
रोशनाने वडिलांना ३० सप्टेंबर रोजी गमावलं होतं. तो आयुष्यातील सर्वात पहिला त्रास होता, असं ती म्हणाली. त्यामुळे तिने तोच दिवस घटस्फोटाबद्दल सांगण्यासाठी निवडला, असंही तिने नमूद केलं.
रोशना ॲन रॉय आणि किचू टेलस यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये अलुवा, कोची येथील सेंट ॲन्स चर्चमध्ये लग्नगाठ बांधली होती. रोशना ओरू अदार लव्ह, पापम चेयथावर कलेरियात्ते, सुल आणि धमाका यांसारख्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तर किचूला त्याच्या ‘लिजोगा’ या पहिल्याच सिनेमाने लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर त्याने ‘स्वाथंथ्र्यम अर्धाथ्रीयिल’, ‘थन्नीर माथन दिनंगल’, ‘अजगजंथाराम’, ‘इरट्टा’ आणि ‘डेविड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.