अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth) सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आपल्या खासगी आयुष्याबाबत ती बिनधास्त व्यक्त होते. हिंदी ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे संभावना प्रकाशझोतात आली. सध्या ती आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रस्त झाली आहे. संभावनाने आई होण्यासाठी आयव्हीएफचा (IVF) आधार घेतला होता. जवळपास तीन वेळा तिने आयव्हीएफ केलं. मात्र तिच्या हाती अपयशच आलं. आता संभावनाला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा – “अक्षु मला सोडून गेला अन्…” भावाच्या निधनानंतर केतकी माटेगावकरला दुःख अनावर, शेअर केली भावूक पोस्ट 

रूमेटाइड अर्थराइटिस (rheumatoid Arthritis) हा आजार आपल्याला झाला असल्याचं संभावनाने सांगितलं आहे. या आजारामुळे तिला चालणं देखील कठीण झालं आहे. हात आणि पायाला सूज, वेदना तिला होत आहेत. आपल्या आजाराबाबत सांगताना संभावनाचा कॅमेऱ्यासमोरच अश्रू अनावर झाले. इतकंच नव्हे तर वाढत्या वजनामुळे तिला बऱ्याचदा ट्रोल देखील करण्यात येतं. पण तिची अशी अवस्था नेमकी का झाली? याचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

पाहा व्हिडीओ

 रूमेटाइड अर्थराइटिस हा आजार संभावनाला आधीपासूनच होता. पण कालांतराने यामधून ती पूर्णपणे बरी झाली. पण पुन्हा एकदा तिच्या या आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजारामुळे संभावना थंड वातावरण देखील सहन करू शकत नाही. संभावना म्हणते, “माझ्यापाठी काही ना काही अडचणी असतात. एक गोष्ट चांगली झाली की लगेच दुसरी गोष्ट समोर येऊन उभी राहते. मला माझा पती अविनाशचं खूप वाईट वाटतं. माझ्यामुळे त्याला हे सगळं सहन करावं लागतं. आयव्हीएफमुळे पुन्हा मला या आजाराचा सामना करावा लागत आहे.”

आणखी वाचा – “नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे…” सयाजी शिंदेंनी शेअर केलेला ‘मी पुन्हा येईन’चा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना ती म्हणाली, “मुल हवं म्हणून मी कित्येकदा आयव्हीएफ केलं. पण माझे सगळे प्रयत्न फसले. अजूनही मी हिम्मत हारणार नाही. मला या सगळ्या प्रसंगांचा सामना करायचा आहे.” अभिनेता-लेखक अविनाश द्विवेदीशी संभावनाने २०१६मध्ये लग्न केलं. सुखी संसार करत असलेल्या संभावनाला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.