अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना क्राईम ब्रांचनं अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी अटक केल्यानंतर बी टाऊनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. फेब्रुवारी महिन्यात मढमधल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यापासून हे प्रकरण सुरू झाल्यानंतर आजपर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी राज कुंद्रा हे देखील एक आहेत. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र, अशा मुद्द्यांवर स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडणारी अभिनेत्री शेरलिन चोप्रा हिची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे शेरलिन चोप्रा गायब झाल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज शेरलिन चोप्रा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत आपलं या प्रकरणावरचं मौन सोडलं आहे.

मीच सर्वात आधी…!

शेरलिन चोप्रानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने या प्रकरणावरची तिची भूमिका स्पष्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “गेल्या काही दिवसांपासून अनेक पत्रकार, माध्यम प्रतिनिधी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की माझं यावर काय म्हणणं आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की या प्रकरणावर महाराष्ट्र सायबर सेलच्या तपास पथकाला सर्वात आधी मी जबाब दिला आहे. त्यांना सगळ्यात आधी आर्म्सप्राईमबद्दल (ArmsPrime) मीच माहिती दिली आहे”.

मी कुठेही गायब झाले नव्हते!

दरम्यान, हे प्रकरण उघड झाल्यानंतर शेरलिन चोप्रा गायब झाल्याची चर्चा बी टाऊनमध्ये सुरू झाली होती. मात्र, आपण कुठेही गायब झालो नव्हतो, असं शेरलिननं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. “मी कुठेही गायब झाले नव्हते. अंडरग्राऊंड झाले नव्हते. इतरांप्रमाणे हे शहर, हा देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मार्च २०२१ मध्ये महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात जाऊन मी माझा निष्पक्ष जबाब दिला”, असं ती म्हणते.

यावर बोलायला खूप काही आहे, पण…

“या मुद्द्यावर बोलायला खूप काही आहे. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर काही बोलणं चुकीचं ठरेल. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलकडे माझ्या जबाबाचा काही हिस्सा तुम्हाला देण्याची विनंती करावी”, असं देखील शेरलिनने या व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.

 

अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूनम पांडेचे राज कुंद्रांवर गंभीर आरोप

एकीकडे शेरलिननं आपली भूमिका स्पष्ट केली नसताना, दुसरीकडे अभिनेत्री आणि मॉडेल पून पांडे हिने मात्र या मुद्द्यावरून स्पष्ट मत मांडलं आहे. “मला धमकी देत माझ्याकडून जबरदस्तीने कॉन्ट्रॅक्टवर सही करून घेण्यात आली. मला शूट करावं लागेल, मला त्यांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने पोज द्याव्या लागतील असं म्हंटलं होतं आणि मी तंस न केल्यास माझ्या काही खासगी गोष्टी लीक केल्या जातील”, असं पूनम पांडे म्हणाली आहे.