बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरून भाजपा आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या प्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येत असताना मराठी कलाकराही व्यक्त होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने या प्रकरणावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री आणि बिग बॉस फेम स्मिता गोंदकर हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्मिता गोंदकर हिने नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “आता भगव्या रंगाची ब्रा…” दीपिकाच्या बिकिनी वादावर मराठमोळ्या स्मिता गोंदकरची बोल्ड प्रतिक्रिया

यात दिलेल्या प्रतिक्रियेमध्या स्मिता गोंदकर म्हणाली, “भगव्या रंगावरुन जो काही वाद सुरु आहे तो काही संपण्याचे नाव घेत नाही. दीपिकाचे काही चुकलंय असं मला तरी वाटत नाही. कुस्तीतल्या आखाड्यात पैलवान लंगोट घालतात तो भगव्या रंगाचा असतो मग त्याबद्दल आपण काही बोलत का नाही? हे फक्त महिलांपुरते मर्यादित आहे का? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.”

“दीपिकानं इतर काहीही विचार करुन ती बिकीन परिधान केलेली नाही. प्रत्येक अभिनेत्रीला स्क्रीनवर छानच दिसायचे असते. पण मलाही याची भीती वाटू लागली आहे. कोणते कपडे घालायचे याचा विचार आता मलाही करावा लागणार आहे”, असेही स्मिता गोंदकरने म्हटले.

आणखी वाचा : “…तर आम्ही खपवून घेणार नाही” दीपिकाच्या भगव्या बिकिनीच्या वादावर पुष्कर श्रोत्री स्पष्टच बोलला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याआधी दिलेल्या एका मुलाखतीत स्मिता गोंदकरने मला भगव्या रंगाची ब्रा परिधान करण्यासही भीती वाटते असे म्हटले होते. “सध्या रंगावरुन जो काही वाद सुरु आहे, त्यामुळे मला खरंच भीती वाटू लागली आहे. हे सर्व प्रकरण बघितल्यानंतर सर्वप्रथम मी माझं वॉर्डरोब चेक केलं. त्यात माझ्याकडील बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही आहे की नाही, याची खात्री केली. मला तर आता भगव्या रंगाची ब्रा परिधान करायलाही दडपण येते. चुकून कोणाच्या नजरेस पडली तर ही लोकं आपलं काय करतील, याचा विचार करुनही भीती वाटते, असे तिने म्हटले होते.