सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. आता कलाकार याबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.
अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरुन नितीन देसाई यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नितीन देसाई यांच्याबरोबरचा शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आणखी वाचा : नितीन देसाईंच्या आत्महत्येबाबत मोठी माहिती समोर, खोलीतून पोलिसांना सापडली ऑडिओ रेकॉर्डिंग्स
नितीन देसाई आणि तिचा एक बिहाइंड द सीन फोटो शेअर करत सोनालीने लिहिलं, “नितीन…किती काम केलं आपण एकत्र.. .तुझ्या पहिल्या मोठ्या कारमध्ये तू आम्हाला चक्कर मारून आणली होतीस.. तुझ्या स्टुडिओतला तुझा पहिला इंटरव्हयू मी घेतला होता..आपल्याला नॅशनल अवॅार्ड एकत्र मिळालं होतं…किती आठवणी…..!!! आत्ता आत्तापर्यंतच्या.. पण तुझ्या आत काय कोलाहल चालू होता कळलंच नाही कधी…वाटलं फक्त तुझ्या कल्पक, भव्य आयडिया आणि स्वप्नं असतात तिथे…एन डी स्टुडिओज हा सर्वार्थानं लॅण्डमार्क आहे सगळ्यांसाठी…हे काय करून बसलास मित्रा…हे काय करून बसलास…खिन्न, उद्विग्न आणि सुन्न…”

हेही वाचा : “काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलीच्या लग्नात तो…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येवर सुबोध भावेची प्रतिक्रिया
नितीन देसाई यांनी ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तर त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते.