अभिनेत्री तितिक्षा तावडे हे नाव मराठी मालिका, चित्रपट विश्वातलीत सर्वांना परिचयाचं नाव आहे. नुकतीच ती क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित ‘शाब्बाश मिथू’ चित्रपटातही झळकली. आता लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती एका मालिकेतून. झी मराठीवर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. काही नव्या मालिकांसह जुने कलाकार पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसत आहेत. या चॅनेलवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यापाठोपाठ त्याचा दूसरा भाग ‘देवमाणूस २’ ही प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा : ‘दुनियादारी २’मध्ये अभिनेता अंकुश चौधरी पुन्हा साकारणार ‘दिग्या’ची भूमिका? अभिनेत्याने केला खुलासा

त्याजागी आता एक नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचं नाव ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ असं आहे. या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले, रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर आयरिस प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा : Video : प्राजक्ता माळीने सई ताम्हणकरला दिले चॅलेंज, पूर्ण करता करता वळली बोबडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सातव्या मुलीची सातवी मुलगी” ही मालिका १२ सप्टेंबर पासून रात्री १०.३० वाजता पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रमुख भूमिकेत तितिक्षाला पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झालेला दिसत आहे. सर्वजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.