सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्लॅन करत असतो. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहेत. तर काहीजण हे वर्ष घरीच साजरे करण्याच्या तयारीत आहे. अनेक सेलिब्रेटी देखील नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी उत्सुक आहेत. नुकतंच ‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेदने तिचा नवीन वर्षाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतचा खुलासा केला आहे.
उर्फी जावेदने तिच्या अधिकृत ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिने पिवळ्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे. उर्फीने या साडीतील अनेक फोटो शेअर केले आहेत. या साडीला मॅचिंग अशी हेअरस्टाईलही तिने केली आहे. यासोबत तिने उर्फीने लाईट मेकअपही केला आहे. या फोटोमध्ये उर्फी डीप नेक ब्लाऊज घातला आहे. यात तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
“मी अजूनही सिंगल पण…”, उर्फी जावेदच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा
उर्फी जावेदने तिचे हे फोटो पोस्ट करत नवीन वर्षाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले आहे. या फोटोसोबत तिने लिहिलेले कॅप्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. उर्फीने हे फोटो शेअर करत त्याला कॅप्शन देताना म्हटले की, “मी सध्या खूप आजारी आहे. कदाचित मला माझे नवीन वर्ष बेडवर घालवावे लागेल. पण असं असलं तरी मला तेच हवं होतं.”
दरम्यान उर्फीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्याने लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचे साडीवरील फोटो प्रचंड चर्चेत आहेत.