मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी राखीला अंबोली पोलिसांनी अटक केली होती. दिवसभर तिची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली. यानंतर आता या प्रकरणावर अभिनेत्री उर्फी जावेदने प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. उर्फी चित्रविचित्र कपडे परिधान करत रस्त्यावर फिरत असल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्यातील हा वाद संपता संपत नसल्याचे दिसत आहे. नुकतंच उर्फीला राखी सावंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उर्फीने ती या अडचणीतून लवकरात लवकर बाहेर यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : न्यूड फोटोशूट ते बोल्ड भूमिका, राखी सावंतच्या अटकेमुळे चर्चेत आलेली शर्लिन चोप्रा कोण?

“राखीने नुकतंच लग्न केलं आहे. त्यामुळे मी तिच्यासाठी फार आनंदी आहे. तिला उत्तम आरोग्य लाभावे हीच माझी सदिच्छा. तसेच तिला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या आयुष्यात सुरु असलेल्या अडचणीतून ती लवकरच बाहेर येईल, अशीच मी प्रार्थना करते”, असे उर्फी जावेदने म्हटले. इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या एका मुलाखतीत तिने ही प्रतिक्रिया दिली.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली होती. काल राखी सावंतने यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळून लावल्याने काल राखीला अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा पोलिसांनी तिची सुटका केली.