स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला कोठारे ही या मालिकेतून एक्झिट घेणार अशा चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच उर्मिलाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. उर्मिलाने स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत वैदहीची भूमिका साकारली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणाऱ्या आईची भूमिका साकारत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडीओत उर्मिलाने या मालिकेतून एक्झिट घेण्याबद्दल भाष्य केले आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहिल्यानंतर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले “या चित्रपटातील…”

उर्मिला कोठारेचे स्पष्टीकरण

“नमस्कार मी उर्मिला कोठारे,

स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मी वैदहीची भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेत माझा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे खूप उलट सुलट चर्चा सुरु आहेत. खूप अफवा पसरल्या आहेत. मी मालिका सोडली का? नक्की काय झालं? अशा अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत.

तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की खऱ्या मालिकेत एका महिन्यानंतर वैदहीचा मृत्यू हा लेखकाने लिहिलेला होता. त्याप्रमाणे गोष्ट चालली आहे. मी अजिबात मालिका सोडलेली नाही. त्यामुळे ज्यांना याबाबतचे प्रश्न पडले, अनेक अफवा पसरल्या आहेत, त्यांना मी विनंती करते की अशा अफवा पसरवू नका. मी अजूनही त्या मालिकेत काम करत आहे आणि स्वराच्या आठवणीत मी तुम्हाला दिसत राहणार आहे”, असे उर्मिलाने या व्हिडीओत म्हटले आहे.

अवघ्या २ महिन्यात उर्मिला कोठारे घेणार ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून एक्झिट, कारण आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेद्वारे उर्मिलाने जवळपास १२ वर्षांनी टेलिव्हीजन विश्वात पुनरागमन केले आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या मुलीची कथा यात पाहायला मिळत आहे. उर्मिला ही ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या सेटवरील धमाल किस्से, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तिने यात वैदेही हे पात्र साकारलं आहे. अनेक वर्षांनी मालिकेत काम करायला फार मजा येत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती.