माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री युक्ता मुखी हिने नव-याविरोधात आंबोली पोलीस चौकीत मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. युक्ताचा पती नागपुरस्थित हॉटेल मालक प्रिन्स टुली असून त्याच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी टुलीविरुद्ध अनैसर्गिक लैगिंक संबंध आणि मानसिक छळाचा गुन्हा नोंदविला आहे.
” आम्ही युक्ताचा जबाब रेकॉर्ड केला असून संपूर्ण चौकशी करुन एक-दोन दिवसांमध्ये टुली आणि त्याच्या कुटुंबियांना अटक करु, असे आंबोली चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मेढे म्हणाले.”
टुली आणि युक्ता २००८ मध्ये विवाहबद्ध झाले होते. मात्र २०१२ साली युक्ता मुंबईला निघून आली होती. तेव्हापासून ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2013 रोजी प्रकाशित
युक्तामुखीची पतीविरोधात तक्रार
माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री युक्ता मुखी हिने नव-याविरोधात आंबोली पोलीस चौकीत मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. युक्ताचा पती नागपुरस्थित हॉटेल मालक प्रिन्स टुली असून त्याच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा आरोप तिने केला आहे.

First published on: 06-07-2013 at 02:02 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress yukta mookhey files for divorce says physically harassed by husband his kin