अदनान सामी हे संगीत विश्वातील लोकप्रिय नाव आहे. काही वर्षांपूर्वी बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे ते खूप चर्चेत आले होते. नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी गायलेली गाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यांनी हिंदीसह कन्नड, तमिळ आणि तेलुगू गाणीही गायली आहेत. या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांना २०२० मध्ये पद्मश्री या भारताच्या चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांचे वडिल अर्शद सामी पाकिस्तानी होते. त्यांचे कुटूंब इंग्लंडला वास्तव्याला असताना अदनान यांचा जन्म झाला. तेथेच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पार्श्वगायन करायला सुरुवात केली. पाकिस्तानशी असलेल्या या संबंधामुळे त्यांच्यावर प्रत्येक वेळी टीका होत असे. पुढे २०१६ मध्ये त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले. ते स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर ते नेहमी व्यक्त होत असतात.

आणखी वाचा – “तारक मेहता…” मालिकेतील अभिनेत्याने साकारला मोदींचा पुतळा; नेटकरी म्हणाले, “याचे पैसे…”

नुकताच त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी “माझ्या मनामध्ये पाकिस्तानबद्दल तिरस्कार का आहे? हा प्रश्न मला बरेचसे लोक विचारतात. माझ्याशी चांगली वागणूक ठेवणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र राग नाहीये. जे लोक माझ्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर मी प्रेम करतो. मला तेथील व्यवस्थापन संस्थेशी अडचण आहे. पाकिस्तानमधील व्यवस्थापन संस्थेने दिलेली वागणूक मी देश सोडण्यामागे असलेल्या कारणांपैकी एक आहेत. ही माहिती फक्त माझ्या जवळच्या माणसांना ठाऊक होती”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – सारा खानला डेट करत असल्याच्या चर्चांवर अखेर शुबमन गिलने सोडलं मौन, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, “मी त्यांचा पर्दाफाश करणार आहे. त्यांनी मला दिलेल्या वागणूकीचा खुलासा मी लवकरच करणार आहे. पाकिस्तानमधील वास्तविक परिस्थिती बऱ्याचजणांना ठाऊक नाहीये. माझ्या या वक्तव्यामुळे सामान्य जनतेला धक्का बसणार आहे. या गोष्टींबाबत मी गेल्या अनेक वर्षांपासून मौन बाळगले होते. पण योग्य वेळ आल्यावर मी त्यावर नक्की बोलेन.” त्यांच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांनी या फोटोद्वारे पाकिस्तानी सरकार आणि लष्करावर निशाणा साधला आहे. या एकूण प्रकरणावरुन काहीजणांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, तर काही त्यांच्यावर टीका करत आहेत.