‘बिग बॉस’ फेम मिनिषा लांबा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता मिनिषा तिच्या घटस्फोटामुळे आणि नव्या बॉयफ्रेंडसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. खरतरं मिनिषाने कोणाचं नाव न घेता ती रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे. मात्र, तिच्या बॉयफ्रेंडचं नाव मिनिषाने सांगितलं नाही. दिल्लीच्या एका व्यावसायिकासोबत मिनिषा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मिनिषाचा बॉयफ्रेंड कोण आहे?

मिनिषाच्या नव्या बॉयफ्रेंडचं नाव आकाश मलिक असल्याचे म्हटले जात आहे. मिनिषा आणि आकाशची भेट दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये झाली होती. त्यांची भेट ही पोकर गेम खेळताना झाली. त्यानंतर मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एवढं असूनही मिनिषाने आकाशचं नाव सांगितलं नाही. मिनिषाला तिच्या रिलेशनशिपविषयी विचारता ती म्हणाली, “मला माझं नातं आणि बॉयफ्रेंडविषयी सगळ्या गोष्टी खासगी ठेवायचं आहे. याचा अर्थ मी रिलेशनशिपमध्ये असल्याच कबूल करते पण माझ्या पार्टनरचं नाव मी सांगू शकतं नाही. कारण त्याचा आणि मनोरंजनसृष्टीचा काहीही संबंध नाही. त्याचं कुटुंब आहे मला त्याच्या कुटुंबाचाही विचार करायचा आहे.”

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

आणखी वाचा : ‘या’ घटनेनंतर तुटली बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांची मैत्री

मिनिषाचा पहिला चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव ‘यहाँ’ असे आहे. हा चित्रपट सुजित सरकारच होता. या चित्रपटात तिने काश्मीरी मुलीची भूमिका साकारली होती. त्यातल्या एका गाण्यामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. त्यानंतर ती ‘बचना ए हसीनो’, ‘हनीमुन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर ‘बिग बॉस ८’ मध्ये मिनिषा दिसली होती.