दीड महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोटी परी म्हणजेच आलिया रणबीरची मुलगी ‘राहा’चं आगमन झालं. तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. तसंच त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करतेय हे चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतंच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती योगासन करताना दिसत आहे.

आलीय सोशल मीडियावर सक्रीय असतेच, ती वर्कआऊटचे व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. या फोटोमध्ये ती एका झुल्यावर लटकताना दिसत आहे विशेष म्हणजे यात तिचे डोके खाली आणि पाय वर आहेत. कॅमेऱ्यासाठी पोज देताना आलियाने नमस्ते केले. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना आलियाने लिहिले की, “हळूहळू दीड महिन्यानंतर माझ्या शिक्षक @anshukayoga यांच्या पूर्ण मार्गदर्शनाने मी आज हे करू शकले. माझ्या सहकारी मातांसाठी, गर्भधारणेनंतर आपल्या शरीराचे ऐकणे महत्वाचे आहे. आपले पॉट जी गोष्ट नाकारत आहे ती अजिबात करू नका. पहिले दोन आठवडे, मी माझ्या वर्कआउट्स दरम्यान फक्त श्वास घेतला. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आपला वेळ घ्या, आपल्या शरीराने काय केले आहे याची प्रशंसा करा.” अशा शब्दात तिने कॅप्शन दिला आहे.

वडिलांचा मृत्यू, लहान वयात सिनेसृष्टीत पदार्पण अन् नैराश्य; अभिनेत्री तुनिषा शर्माबद्दल या गोष्टी माहितीये का?

आलियाच्या गरोदरपणात ती बाळाच्या जन्मानंतर वर्षभर तरी काम करणार नाही, ती वर्षभर कामापासून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आलियाने वेगळाच विचार केला आहे. राहाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतरच ती नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होती. गरोदरपणा नंतर ते थेट याच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असंही बोललं गेलं. मात्र आता ती फरहान अख्तर च्या नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.