बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिदचा नुकताच ‘जर्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘जर्सी’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ‘जर्सी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी शाहिदने मोठा खुलासा केला आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार शाहिदने मीडियाी बोलताना सांगितले, ” ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी सगळ्यांकडे भिकाऱ्यासारखा गेलो होतो. ज्यांनी २०० ते २५० कोटींचे चित्रपट बनवले अशा लोकांकडे मी गेलो होतो. मी कधीच अशा चित्रपटांचा भाग नव्हतो म्हणून हे माझ्यासाठी नवीन होतं.”

पुढे शाहिद म्हणाला, “चित्रपटसृष्टीत १५ ते १६ वर्षे राहिल्यानंतर माझ्याकडे इतका मोठा ग्रोसर नव्हता. जेव्हा हे सगळं झालं तेव्हा मला माहित नव्हतं की हे कसं झालं. हा माझा आता पर्यंतचा सगळ्यात चांगला चित्रपट होता.”

आणखी वाचा : …म्हणून निलेश साबळेने मागितली नारायण राणेंची माफी

शाहिदचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट २०१९ मध्ये सुपरहिट झालेल्या चित्रपटांपैकी एक होता. एवढचं काय तर चित्रपटाने २५० कोटींच्या जवळपास कमाई केली होती.

आणखी वाचा : प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जर्सी’ हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात एका क्रिकेटरची कहाणी दाखवण्यात आली आहे. वयाच्या ३० व्या वर्षी तो कसा भारतीय क्रिकेट टीममध्ये येतो आणि देशासाठी क्रिकेट खेळतो. ‘जर्सी’च्या तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हेच हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. तेलुगू चित्रपटात नानी आणि श्रद्धा श्रीनाथ ही जोडी मुख्य भूमिकेत होती. तर हिंदीच शाहिदसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘कबीर सिंग’नंतर शाहिदचा हा दुसरा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहिदने या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.