बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अक्षय ‘सम्राट पृथ्वीराज’ यांच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही आणि आता चित्रपट फ्लॉप होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम

चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर अक्षयच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे त्याच्या आगामी चित्रपटांनाही समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया दिली जात नाही, त्यामुळे अभिनेत्याचे पुढील चित्रपटांचे करिअर धोक्यात येऊ शकते. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की यशराजच्या ‘धूम 4’ या चित्रपटात अक्षय कुमार देखील दिसणार आहे, पण आता मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारला चित्रपटातून वगळण्यात आल्याचे म्हटले जातं आहे.

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट

या चित्रपटात तो नकारात्मक भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट फ्लॉप झाल्याने अक्षयला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यशराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी चर्चा मात्र अशाच आहेत. बॉक्स ऑफिसच्या बिझनेसनुसार अक्षयच्या चित्रपटाने रिलीजच्या ११व्या दिवशी केवळ १.२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कमी कमाई खरोखरच धक्कादायक आहे. अक्षयचे चित्रपट सतत फ्लॉप होत आहेत. आधी ‘बेल बॉटम’ चालला नाही, मग ‘बच्चन पांडे’ही बॉक्स ऑफिसवर पडला आणि आता ‘सम्राट पृथ्वीराज’नेही सगळ्या आशा धुडकावून लावल्या. तब्बल १३ वर्षांनी अक्षय यशराज बॅनरसोबत काम केले पण हा चित्रपट फ्लॉप झाला.

आणखी वाचा : Siddhanth Kapoor Drug Test : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…”

‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. यात त्याच्यासोबत मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी बनवलेल्या या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After samrat prithviraj huge flop akshay kumar out from dhoom 4 dcp
First published on: 14-06-2022 at 20:36 IST