बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नालतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. अशातच एका फोटोवरुन शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
खंडाळ्यातील एका फार्म हाऊसवर फरहान आणि शिबानी यांचा लग्नसोहळा पार पडला. दरम्यान शिबानीने लाल रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. दरम्यान, या ड्रेसवरुन शिबानी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना अडकणार लग्न बंधनात?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फरहान आणि शिबानीच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘लग्नाआधीच शिबानी प्रेग्नंट आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘ती प्रेग्नंट आहे का?’ असे म्हटले आहे.

फरहान आणि शिबानी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. दरम्यान, फरहानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचे नाव अधुना अख्तरअसून त्यांना २ मुले आहेत. अधुना आणि फरहान यांचे २००० साली लग्न झाले होते. १७ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर २०१९ मध्ये शिबानी आणि फरहान रिलेशनशिपमध्ये आले.