बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना करोनाच संसर्ग झाला. त्या पाठोपाठ ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याची देखील करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली. त्यानंतर अनेक कलाकारांसोबतच चाहत्यांनी देखील ट्विट करत बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना केली. दरम्यान अभिनेता विवेक ओबेरॉयने देखील ट्विट करत बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे.

विवेकने ऐश्वर्या आणि आराध्याला करोना झाल्याची बातमी शेअर करत बच्चन कुटुंबीय लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

आणखी वाचा : ‘तुझी लक्षणं ठीक दिसत नाहीत’, बिग बींसाठी केलेल्या ट्विटमुळे जूही चावला झाली ट्रोल

त्यापूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच त्याने ट्विट करत काळजी घेण्यास सांगितले होते. या ट्विटमध्ये त्याने, अमिताभ बच्चन सर आणि अभिषेक बच्चन हे लवकर बरे व्हावेत म्हणून आम्ही सर्वजण प्रार्थना करत आहोत. तुम्ही काळजी घ्या असे म्हटले होते.

एकेकाळी ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉयच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होता. त्यामुळे आता विवकने केलेल्या ट्विटमुळे सर्वांचे लक्ष वेधले असल्याचे म्हटले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत त्यांना आणि अभिषेकला करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच अभिषेकने ट्विट करत पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले. माझी आई जया बच्चन आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचेही अभिषेकने सांगितले.