बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने मोठ्या पडद्यानंतर आता आपला मोर्चा छोट्या पडद्यावर वळवला आहे. अजय लवकरच बाबा रामदेव यांच्यावर बायोपिक काढणार आहे. पण हा बायोपिक प्रेक्षक सिनेमाच्या माध्यमातून नाही तर मालिकेच्या माध्यमातून लोकांना पाहता येणार आहे. रामदेव यांच्या आयुष्यावर बेतलेली ही मालिका असेल. ‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या मालिकेचे नाव ‘स्वामी बाबा रामदेवः द अनटोल्ड स्टोरी’ असे असणार आहे. या मालिकेत बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक घटना दाखवल्या जाणार आहेत.

स्वतःवरचेच व्हायरल जोक्स जेव्हा रिंकू वाचते…

या मालिकेदरम्यान, बाबा रामदेव यांचा सर्वसामान्य माणूस ते आंतरराष्ट्रीय आयकॉनपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. असं म्हटलं जातं की हे वर्ष संपेपर्यंत हा शो सुरू केला जाईल. धर्म-वीर या टिव्ही मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता विक्रांत मेस्सी हा बाबा रामदेव यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जाते. पण अजूनपर्यंत यासंबंधीत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. ‘फिल्म फेअर’ने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रांत सध्या रामदेव यांच्यासारखा लूक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

रामदेव यांच्या व्यक्तिरेखेसाठी विक्रांतने फक्त केसच वाढवले नाहीत तर दाढीही वाढवली आहे. असेही म्हटले जाते की, बाबा रामदेव कसे राहता हे जवळून पाहण्यासाठी विक्रांत काही दिवस त्यांच्यासोबत राहायलाही गेला होता. योगा करतानाच्या त्यांच्या हरकती आणि इतर सवयी यांचे बारकावे विक्रांतने यावेळी पाहिले. पण माशी कुठे शिंकली काय माहित विक्रांतने या मालिकेतून काढता पाय घेतला. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट केले की, बाबा रामदेव यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी तयारीही केली होती. पण काही कारणांमुळे तो आता ही मालिका करणार नाही. कारणं काहीही असलं तरी त्याने या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

पाकिस्तानच्या विजयावर ऋषी कपूरचे ट्विट, चाहते भडकले

सध्या अजय देवगण त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. त्याच्या हातात मिलन लुथरा दिग्दर्शित ‘बादशाहो’ आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ हे दोन सिनेमे आहेत. नुकतेच ‘बादशाहो’ या सिनेमाचे काही पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.