बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अक्षय कुमार हा या वर्षातील यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. फक्त चित्रपट नाही तर अक्षय कुमार सामाजिक कार्य करताना ही दिसतो. अक्षय बऱ्याच वेळा समाज कार्यासाठी देणगी देताना दिसतो. आता अक्षयने काश्मीरमध्ये शाळा सुरु करण्यासाठी १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच १७ जून रोजी काश्मीरमधील सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ काश्मीर बेसवर अक्षय कुमार गेला होता. इथे अक्षयने तुटलेली शाळा पाहिली आणि तिला पुन्हा एकदा उभारण्यासाठी देणगी देण्याची इच्छा व्यक्य केली होती. त्यानंतर काल बीएसएफने त्यांच्या ऑफिशल ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत शाळे विषयी एक माहिती दिली आहे. शाळेसाठी पायाभरणी करण्यात आली आहे. तर या शाळेचे नाव अक्षय कुमारचे वडील हरी ओम भाटिया यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : VIDEO: ‘मी काय कुंद्रा आहे का?’ पाहा असं का म्हणाले राज ठाकरे
DG BSF Sh Rakesh Asthana along with Sh @akshaykumar Padma Shri laid foundation stone of Hari Om Bhatia Education Block at Govt Middle School Niru, Kashmir in presence of Smt Anu Asthana, President BWWA & Sh Surendra Panwar, SDG Western Command BSF through weblink today#JaiHind pic.twitter.com/7lO9VvQ7up
— BSF (@BSF_India) July 27, 2021
आणखी वाचा : राज कुंद्रा नाही तर शिल्पा शेट्टीच्या अॅपसाठी विचारणा झाली होती, सेलिना जेटलीचा खुलासा
दरम्यान, अक्षय कुमारचा सुर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. मात्र, करोनाच्या संसर्गामुळे प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय अक्षयने अतरंगी रे या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. तर तो बच्चन पांडे, बेल बॉटम, रक्षाबंधन, पृथ्वीराज आणि राम सेतु या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.