बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. अक्षय कुमार अनेकदा एखाद्या चित्रपटाचे शूटींग संपण्यापूर्वीच दुसऱ्या चित्रपटांची घोषणा करतो. विशेष म्हणजे अनेकदा तो एकावेळी अनेक चित्रपटांचे शूटींगही करताना दिसतो. करोना काळातही अक्षय कुमार हा सातत्याने चित्रपटांचे शूटींग करताना पाहायला मिळत होता. लॉकडाऊनंतर चित्रपटगृह सुरु झाल्यापासून अक्षयचे लागोपाठ पाच चित्रपट प्रदर्शित झाले. यानंतर पुन्हा एकदा त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

अक्षय कुमारने नुकतंच अभिनेता इम्रान हाश्मीसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ते दोघेही सेल्फी घेताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी हे दोघेही लवकरच सेल्फी या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

अक्षय कुमारच्या आगामी सेल्फी चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. याची घोषणा करताना त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या स्वत:चा एक सेल्फी शेअर केला आहे. अक्षयचा हा सेल्फी मुंबईतील एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर काढण्यात आला आहे. यात अक्षय कुमारने सोनेरी रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे. ‘मी दिवसाची सुरुवात एका सेल्फीने करतो, कारण का नाही?’ असा प्रश्न त्याने विचारला आहे.

तर दुसरीकडे इम्रान हाश्मीने हुबेहुब अक्षय कुमारप्रमाणे फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना इम्रान हाश्मी म्हणाला, नवीन लूक, नवीन वाइब्स, अक्षय कुमारकडून प्रेरणा घेऊन मी माझा दिवस सेल्फी सोबत सुरु करतोय. दरम्यान या दोघांनीही हा फोटो टाकल्यानंतर चाहतेही काही काळ गोंधळात पडले होते. मात्र त्यानंतर अक्षय कुमारने त्यांचा एकत्र फोटो शेअर करत चाहत्यांचा गोंधळ दूर केला.

मी माझे करिअर न निवडता तुला निवडले पण…; अक्षयसोबत साखरपुडा मोडण्याचे रवीनाने सांगितले होते कारण

अक्षय कुमाराने इम्रानसोबत फोटो शेअर करत मला माझा परफेक्ट सेल्फी पार्टनर सापडला, असे त्याने म्हटले आहे. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचे हे सेल्फी कनेक्शन चित्रपटाशी संबंधित आहे. हे दोघेही ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहे. सध्या ते दोघेही या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव ‘सेल्फी’ असल्याचे बोललं जात आहे.