'सम्राट पृथ्वीराज'च्या अपयशानंतरही अक्षयची गाडी सुसाट, निर्मात्याचं मात्र १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान | akshay kumar film samrat prithviraj facing huge loss yet to cover over 100 crore and actor next movie announce soon | Loksatta

‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतरही अक्षयची गाडी सुसाट, निर्मात्याचं मात्र १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या अपयशानंतर अक्षय कुमार आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’च्या अपयशानंतरही अक्षयची गाडी सुसाट, निर्मात्याचं मात्र १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान
'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाच्या अपयशानंतर अक्षय कुमार आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आता या चित्रपटाचे काही शो रद्द देखील करण्यात आले आहेत. पण ‘सम्राट पृथ्वीराज’ला मिळालेल्या अपयशामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मात्र चांगलाच फटका बसला आहे. निर्मात्याचं १०० कोटी रुपयांच्या घरात नुकसान झालं आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो रद्द, चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकच नसल्यामुळे घेतला निर्णय

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाचा बजेट हा जवळपास २५० कोटी रुपयांच्या घरात होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘सम्राट पृथ्वीराज’ या नावावरुनच वाद सुरु झाला. अखेरीस चित्रपटाचं नाव बदलल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.

एका आठवड्यात या चित्रपटाने फक्त ५५ कोटी रुपये कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या चौथ्या दिवशीच ‘सम्राट पृथ्वीराज’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. चित्रपटाचं बजेट पाहता चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान सहन करावं लागलं असल्याचंच दिसत आहे. आदित्य चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली होती.

आणखी वाचा – विमानामध्ये पूजा हेगडेबरोबर घडला विचित्र प्रकार, इंडिगोच्या कर्मचाऱ्याने दिली वाईट वागणूक

अक्षय मात्र चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतरही थांबला नाही. त्याच्या आता आगामी चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. स्टारकिड अनन्या पांडेबरोबर अक्षय चित्रपट करणार असल्याचं बोललं जात आहे. आपल्या वयापेक्षा ३१ वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर तो काम करणार आहे. दिग्दर्शक करण जौहरच्या नव्या चित्रपटासाठी अक्षय-अनन्याची निवड करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2022 at 13:38 IST
Next Story
“त्या दोन महिन्यात माझी मुलगी…” स्तनाच्या कर्करोगाचा अनुभव सांगताना महिमा चौधरी झाली भावूक