डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘Into The Wild’ हा शो अतिशय लोकप्रिय आहे. बेअर ग्रिल्स सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. त्याला बेअर ग्रिल्ससोबत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच अक्षयने त्याचा एपिसोड कधी प्रदर्शित होणार याबाबत माहिती दिली आहे.
अक्षयने ट्विट करत ‘Into The Wild’चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय आणि बेअर गिल्स जंगलात फिरताना दिसत आहेत. तसेच १० दिवसांनंतर म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी एपिसोड प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.
I visualized stiff challenges prior to #IntoTheWildWithBearGrylls but @bearGrylls completely surprised me with the elephant poop tea What a day @DiscoveryIn @DiscoveryPlusIn pic.twitter.com/m6YfQXmCcM
— Akshay Kumar (@akshaykumar) August 31, 2020
अक्षय हा बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांच्या यादीमधील एक आहे. त्याचे वर्कआऊट व्हिडीओ नेहमी चर्चेत असतात. तसेच तो बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे इंटू द वाइल्ड या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अक्षयला पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
‘Into The Wild’ या शोमध्ये सहभागी होणारा अक्षय कुमार तिसरा भारतीय आहे. सर्वात पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत हे सहभागी झाले. कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या शोमधील एपिसोडचे चित्रीकरण करण्यात आला होता. आता अक्षय कुमार शोमध्ये पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.