बॉलीवूडचा अॅक्शन हिरो म्हणून अक्षय कुमारची प्रसिद्धी आहे. आता हा अॅक्शन हिरो स्वतःचे मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असल्याची चर्चा आहे.
अक्षयने भारतात एटवोन्डो ब्लॅक बेल्ट प्रशिक्षण घेतले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने मार्शल आर्ट स्पर्धेत पुढाकार घेतला होता. आणि आता तो युवा नेता आदित्य ठाकरेसोबत मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांसाठी सुरु करण्यात येणारी ही प्रशिक्षण शाळा मुंबईत सुरु होणार असून पुढे जाऊन त्याच्या महाराष्ट्रातही शाखा उघडण्याची शक्यता आहे. या प्रशिक्षण शाळेचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
अक्षय कुमार काढणार मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्र
बॉलीवूडचा अॅक्शन हिरो म्हणून अक्षय कुमारची प्रसिद्धी आहे.
First published on: 04-02-2014 at 03:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar to launch martial arts school