scorecardresearch

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याची अंगठी आहे फारच खास, फोटो पाहिलात का?

यात त्या दोघांच्या अंगठ्या पाहायला मिळत आहे.

akshaya Devdhar And Hardik Joshi engagement
akshaya Devdhar And Hardik Joshi engagement

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला. यानंतर अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर आता नुकतंच त्यांनी त्यांच्या साखरपुड्याच्या अंगठीचे फोटो शेअर केले आहे.

अक्षया देवधर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. गेल्या काही दिवसांपासून ती साखरपुड्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. नुकतंच तिने त्यांच्या साखरपुड्याचे अंगठीचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने दोघांच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. यात त्या दोघांच्या अंगठ्या पाहायला मिळत आहे.

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

यात अक्षया आणि हार्दिकच्या अंगठीवर डायमंड असल्याचे पाहायला मिळत आहे. यात अक्षयाच्या अंगठीवर असलेला डायमंड हा थोडा मोठा आहे. तर हार्दिकच्या अंगठीवरील डायमंड हा लहान असल्याचे दिसत आहे. पण त्या दोघांच्या अंगठीची डिझाईन ही सारखीच आहे.

Video : “आमच्या दोघांचा…”, राणादासोबत साखरपुडा झाल्यानंतर पाठकबाईंची खास पोस्ट

दरम्यान छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले होते. यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला आहे. याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshaya deodhar and hardeek joshi share engagement ring photo viral nrp

ताज्या बातम्या