Akshaye Khanna kissed rumoured ex Karisma Kapoor’s hand on her wedding : २००३ मध्ये करिश्मा कपूरने संजय कपूरशी लग्न केले. पण, करिश्माच्या लग्नाआधीच तिचा अभिषेक बच्चनशी साखरपुडा झाला होता; पण त्यानंतर विवाहाआधीच ते एकमेकांपासून दूर झाले.
पण, अभिषेकच्या आधी आणखी एक अभिनेता होता, ज्याच्याशी करिश्माचे लग्न होणार होते. या अभिनेत्यानेही करिश्माच्या लग्नाला हजेरी लावली आणि सर्वांसमोर सार्वजनिकरीत्या अभिनेत्रीच्या हाताचे आदरपूर्वक चुंबन घेतले.
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अक्षय खन्ना होता. एक काळ असा होता, जेव्हा करिश्मा आणि अक्षयच्या नात्याची बॉलीवूडमध्ये चर्चा होती. रिपोर्टनुसार, करिश्माच्या वडिलांनीही या नात्याला मान्यता दिली होती.
२००३ मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्या काळातील हा इंडस्ट्रीतील सर्वांत मोठ्या लग्नांपैकी ते एक होते. करिश्मा आणि संजय यांनी २९ सप्टेंबर २००३ रोजी हिंदू आणि शीख पद्धतीने गुरुद्वारात लग्न केले. त्यानंतर करिश्माच्या मुंबईतील कृष्णा राज बंगल्यामध्ये एक भव्य समारंभ पार पडला.
सलमान खान, गोविंदा, अमरीश पुरी, विवेक ओबेरॉय, तब्बू, राजेश खन्ना आणि इतर अनेक कलाकार या लग्नात उपस्थित होते. करिश्मा कपूर आणि संजय कपूरच्या लग्नाच्या काही जुन्या व्हिडीओंमध्ये अक्षय खन्ना या पार्टीत दिसत आहे. यावेळी गुलाबी रंगाचा लेहेंगा घालून करिश्मा कपूरला तिच्या लग्नाचे अभिनंदन करण्यासाठी आलेला अक्षय खन्ना वधूच्या हाताचे चुंबन घेताना दिसला.
करिश्मा आणि संजयला भेटताच अक्षयने दोघांना शुभेच्छा दिल्या आणि करिश्माच्या हाताचे चुंबन घेतले. अक्षयबरोबर त्याचा भाऊ राहुल खन्ना आणि त्याची आई गीतांजली खन्ना हेदेखील होते. अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांच्यात खूप चांगले संबंध होते आणि त्याला ती तिचा खूप चांगला मित्र मानत असे. काही काळानंतर दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि रणधीर कपूर यांनीही त्यांच्या नात्याला होकार दिला होता.
बबितांचा करिश्मा – अक्षय खन्नाच्या लग्नास विरोध
पण, करिश्माची आई बबिता यांना हे नाते आवडले नाही. बबिता यांनी हे लग्न होऊ दिले नाही. असे म्हटले जाते की, अक्षय खन्नाच्या कौटुंबिक जीवनामुळे बबिता यांना वाटले की, हे नाते त्यांच्या मुलीसाठी योग्य नाही.