‘अलादीन: नाम तो सुना होगा’ या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या आशी सिंह हिने सासू-सुनांच्या मालिका करण्यास साफ नकार दिला आहे. ‘अलादीन’ या फँटसी मालिकेच्या लोकप्रियतेमुळे आशीला अनेक नामांकित मालिकांच्या ऑफर मिळाल्या होत्या. परंतु या सर्व मालिका सासू-सुनांच्या कथानकाभोवती फिरतात, शिवाय यामध्ये भरपूर रडावे देखील लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या मालिकांपासून दूर राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

अवश्य पाहा – “चाप ओढला अन् कान सुन्न झाले”; ‘मिर्झापूर २’साठी अभिनेत्रीने केली खरीखुरी ‘शुटिंग’

इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आशीने आपल्या भविष्यकालीन योजना सांगितल्या. ती म्हणाली, “अलादीन सुपरहिट झाल्यापासून मला अनेक मालिकांच्या ऑफर मिळत आहेत. पण दुदैवाने बहुतांश मालिका या सासू-सुनांच्या आहेत. अशा प्रकारच्या मालिकांना भरपूर टीआरपी मिळतो. पण मला काही तरी वेगळं करायचं आहे. एकाच प्रकारची भूमिका वर्षानुवर्ष साकारण्याची इच्छा मला नाही. शिवाय सासू-सुनांच्या मालिकांमध्ये तुम्हाला भरपूर रडावं देखील लागतं. त्यामुळे प्रेक्षकांना सतत दु:खात आणि नैराश्येत ठेवणाऱ्या कुठल्याच मालिकांमध्ये मी कधीही काम करणार नाही.”

अवश्य पाहा – Video: पिक्चरसाठी कायपण! अभिनेत्याने धावत्या बुलेट ट्रेनवरुन केला खतरनाक स्टंट

आशी सिंह एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २०१५ मध्ये द सिक्रेट डायरीज या शोमधून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ये उन दिनों की बात है या मालिकेत ती झळकली होती. सध्या ती ‘अलादीन: नाम तो सुना होगा’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. तिने कॅडी बँड नावाच्या एका चित्रपटातही काम केलं होतं.