बॉलिवूडमध्ये लगीनघाई, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘या’ महिन्यात करणार लग्न?

आलिया आणि रणबीर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नुकतंच दिवाळीच्या मुहूर्तावर आलिया आणि रणबीर हे दोघेही एकत्र एका पूजेच्या मंडपात दिसले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या विविध चर्चांना उधाण आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया आणि रणबीर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यांनी काही कारणात्सव हे लग्न पुढे ढकलले आहे. आलिया-रणबीर हे येत्या डिसेंबरमध्ये लग्न करु शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबतही कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

आलियाच्या रणबीरला दिवाळीनिमित्त खास शुभेच्छा, फोटो शेअर करत म्हणाली…

गेल्यावर्षी रणबीर कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, जर कोरोनाची लाट आली नसती तर मी आलियाशी २०२० मध्येच लग्न केले असते. मलाही लवकरच लग्नाची तारीख निश्चित करायची आहे, असे त्याने सांगितले होते. दरम्यान यानंतर ते दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करू शकतात, अशा चर्चा सुरु होत्या. मात्र आता हे कपल पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. लग्न पुढे ढकलण्यामागे आलिया आणि रणबीर यांच्या वर्क कमिटमेंट असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे ते दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग संपवून लवकरच लग्न करतील, असं सांगितले जात आहे.

आलिया आणि रणबीर दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आलिया ही ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘डार्लिंग्स’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यातील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटींग अद्याप बाकी आहे. तर रणबीर हा सध्या ‘शमशेरा’, ‘ऐनिमल’ या सारख्या चित्रपटात व्यस्त आहे.

“मॅडम रणबीरसोबत चाला…”; आलियाचे भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान यातील बहुतांश चित्रपटाचे शूटींग एकतर पूर्ण झाले आहे किंवा पूर्ण होणार आहे. त्यामुळे आलिया-रणबीर या चित्रपटांचे शूटींग संपवून मगच लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. आलिया आणि रणबीरला कोणतीही घाई न करता लग्न करायचे आहे. त्यांच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंब हे खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांना थाटामाटात लग्न करायचे आहे. सध्या त्यांच्या कृष्णा राज या बंगल्याचे नूतनीकरण सुरू आहे. तर दुसरीकडे करोनाची भीती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. त्यामुळे या कुटुंबाला अजून थोडा वेळ घ्यायचा आहे. त्यामुळे आता कपूर कुटुंब आलिया-रणबीरच्या लग्नाची अंतिम तारीख कधी जाहीर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alia bhatt and ranbir kapoor may tie the knot in this month nrp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news