आलियाच्या रणबीरला दिवाळीनिमित्त खास शुभेच्छा, फोटो शेअर करत म्हणाली…

आलियाने रणबीरसोबतचा एक छान रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र यंदाची दिवाळी रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांसाठी फारच खास ठरली आहे. कारण अखेर आलिया आणि रणबीरने एकत्र फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे सध्या आलियाची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ते दोघेही त्यांच्या अफेअरमुळे किंवा चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र दिवाळीच्या निमित्ताने नुकतंच आलियाने रणबीरसोबतचा एक छान रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने आणि प्रेमासोबत…दिवाळीच्या शुभेच्छा, असे आलियाने म्हटले आहे.

या फोटोत रणबीर आणि आलिया हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांच्या या फोटोत एकमेकांकडे बघताना फार गोड हसून लाजून बघत आहेत.

दरम्यान यापूर्वीही आलियाने रणबीरच्या वाढदिवसानिमित्त एकत्र फोटो शेअर केला होता. पण हा फोटो पाठमोरा असल्याने रणबीरचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र आता आलियाने त्यांचा एकत्रित फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. आलियाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. 

मे २०१८ मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आलिया- रणबीर जोडपं पहिल्यांदा समोर आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा आहे. एका मुलाखतीत रणबीरनं आलियावरचं आपलं प्रेमही मान्य केलं होतं. त्यानंतर आता आलियानेही खुल्लम खुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. दरम्यान ही लोकप्रिय जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातून दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alia bhatt shares romantic picture with boyfriend ranbir kapoor on diwali nrp