बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. आज १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरने ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हे फोटो शेअर करत “आज आमच्या कुटूंब आणि मित्रमंडळींनी समोर घरी… – बाल्कनीतील आमच्या आवडत्या ठिकाणी…आम्ही पाच वर्षे पूर्ण केली. आज आम्ही लग्न केले. आमच्यासोबत बऱ्याच आठवणी असताना आता आणखी आठवणी तयार करण्यासाठी प्रतिक्षा करू शकतं नाही…आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम, रणबीर आणि आलिया”, असे कॅप्शन आलियाने दिले आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : Ranbir Alia Wedding Photo : आलियाने शेअर केले शाही लग्नातील ‘हे’ खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया आणि रणबीरचे लग्नासाठी चार पंडितांनी मिळून मंत्रोच्चार केले. विशेष म्हणजे सप्तपदी घेण्यापूर्वी गायत्री मंत्राचे पठणही करण्यात आले. या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले आहेत.