‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहरुख खानवर प्रशंसांचा पाऊसच पडत आहे. ट्विटरच्या माध्यमातून तर विविध कलाकार आणि चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पण, ट्विटरवरुन होणाऱ्या या प्रशंसात्मक ट्विटमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे सिद्धार्थ मल्होत्राच्या ट्विटने. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या दोन्ही कलाकारांनी एकत्र चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतरच आलिया आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, या दोन्ही कलाकारांच्या नात्यामध्ये काही काळानंतर दुरावा आला आणि त्यांच्या नात्याला तडा गेला आहे अशा चर्चाही काही दिवसांपासून होत आहेत. पण, ‘डिअर जिंदगी’च्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मात्र तसे काहीच दिसत नाहीये.
या व्हिडिओमध्ये काही प्रश्नांची उत्तरे देत असतानाच आलियाने ‘आय लव्ह यू सिद्धार्थ’ असे म्हटले आहे. त्यामुळे नक्की या दोन कलाकारांच्या नात्यामध्ये नेमके काय सुरु आहे याचा काहीच नेम लागत नाहीये. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थला त्याच्या आणि आलियाच्या नात्याविषयी विचारले असता ‘याविषयीचा निर्णय कोणीच करु शकत नाही. कोणालाच माहित नाहीये की भविष्यात काय होईल. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये आम्ही आमचा वेळ जास्तीत जास्त प्रकारे कसा चांगला व्यतीत करता येईल त्यावरच लक्ष देत आहे. इथे आम्ही नाव कमवण्याला प्राधान्य देत आहोत. यादरम्यानच तुम्हाला विविध लोक भेटतात. मी आणि आलियाने आतापर्यंत दोन चित्रपटांध्ये काम केले आहे. त्यामुळे आमच्या नात्यामध्ये कोणताही संकोचले पणा नाहीये’, असे सिद्धार्थ म्हणाला होता.
दरम्यान ‘डिअर जिंदगी’च्या प्रसिद्धीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये आलियाला ‘तीला सिद्धार्थ आवडतो का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आलिया म्हणाली ‘हो नक्कीच…आय लव्ह सिद्धार्थ’. आलियाच्या या वक्तव्यामुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Heartwarming radiant vulnerable n the heart beat of #DearZindagi @aliaa08 gives her best performance till now love n power to u way to go.
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) November 24, 2016
Haha aww thank you Sid!!!!!! Love you https://t.co/kldjQ9HrNT
— Alia Bhatt (@aliaa08) November 24, 2016
सध्या गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाला चित्रपट कलाकारांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे असेच दिसत आहे. चित्रपटाचे कथानक आणि त्याचा प्रभाव पाहता आजच्या तरुणाईच्या जवळ जाणारा चित्रपट गौरी शिंदेने प्रेक्षकांसमोर आणला आहे. पण काही बाबतीत होणाऱ्या टीकांपासून मात्र हा चित्रपटही वाचलेला नाही. त्यामुळे थोड्याथोडक्या टीका आणि प्रेक्षकांतर्फे मिळणारा प्रतिसाद अशीच संमिश्र सुरुवात या चित्रपटाच्या वाट्याला आली आहे हे चित्र चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळत आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रटपटामध्ये अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्याव्यतिरिक्त कुणाल कपूर, अंगद बेदी, अली जफर, इरा दुबे हे कलाकारही झळकत आहेत.