बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आलिया सध्या रणवीर सिंगसोबत मुंबईत ‘गली बॉय’ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. पण सध्या सोशल मीडियावर आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखोजणांनी लाइक केले आहे. जवळच्या मैत्रिणीच्या लग्नात आलियाने ‘मुबारकां’ सिनेमातील ‘हवा हवा’ या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसते. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत इतर मित्र-मैत्रिणी नाचताना दिसत आहेत. या दरम्यानचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डान्स करताना आलिया फार आनंदी दिसत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर ‘गली बॉय’ सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. या सिनेमाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि रणवीर दोघंही फार वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरात या सिनमाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. आलिया या फोटोंमध्ये हिजाब ओढलेली दिसत आहे. तर रणवीरचा लूक फारच साधा आहे. त्याचा हा लूक पाहून ‘बँड बाजा बारात’ सिनेमातील त्याच्या लूकची आठवण येते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt dances her heart out hawa hawa song her best friend marriage
First published on: 22-01-2018 at 15:09 IST